पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कच्या मनमोहक सुगंधाने रंगला 'तू ही रे' सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा

संजय जाधव यांच्या दुनियादारी, प्यारवाली  लव्हस्टोरी यासुपरहिट सिनेमांनी बॉक्स ऑफीसवर कमाल दाखवली. अशीच काहीशी कमाल दाखवण्यासाठी  संजय जाधवयांची आणखी एक फिल्म सज्ज झाली आहे. प्रेक्षकांना'प्रेम', 'मैत्री' अशा नात्यांवर विश्वास ठेवायला भागपडणाऱ्या सिनेमांच्या यादीत तू ही रे  सिनेमाचं नावलवकरच दाखल होणार आहे. दुनियादारीने मैत्रीची सफरघडवून आणली तर प्यारवाली लव्हस्टोरीने प्रेमाच्या एकाअनोख्या जगात नेलं आणि आता तू ही रे प्रेक्षकांनाकोणत्या वळणावर घेऊन जाणार आहे याबाबत उत्सुकतानिर्माण झाली आहे.  रोमॅंटिक सागा असलेल्या तू ही रे यासिनेमाचा म्युझिक लाँचचा सोहळा नुकताच संपन्न झाला. सिनेमातील गाण्याची झलक या निमित्ताने सगळ्यांनीऐकली आणि अनुभवलीही. मराठी सिनेसृष्टीतीलआघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार, गिरीश ओक अशी तगडीस्टारकास्ट असलेल्या या सिनेमात प्रेक्षकांना पुन्हा एकदालव्हस्टोरी एका वेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे.  

पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कच्या साथीने आणि तू ही रेसिनेमाच्यावतीने 'तू ही रे नेक्स्ट ड्रीम फ्लोवरगर्ल' कॉनटेस्टआयोजित केली आहे. या कॉनटेस्ट अधिक माहिती देतानाहिंदुस्तान युनिलिव्हर पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कचे कॅटेगरी हेडश्रीनंदन सुंदरम म्हणाले की, पॉंड्सचा सुगंध  आतापर्यंतभारतातील विविध संस्कृतीत दरवळत आहे. 'तू ही रे' च्यानिमित्ताने मराठी संस्कृतीत देखील पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कचासुगंध दरवळेल. आजकालच्या महत्वाकांक्षी महिला स्वप्नपाहतात आणि पूर्णही करतात. पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कमुळेमिळणारा सुगंध आणि तजेलदारपणा त्याच्यातीलआत्मविश्वास वाढवतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजेअभिनेत्री सई ताम्हणकर. ती परफेक्ट 'ड्रीमफ्लोवर गर्ल' आहे. चित्रपटात नंदिनीची भूमिका  करणाऱ्या सईच्या अभिनयाचा दरवळ असाच दिर्घकाळ राहील. त्याचबरोबरपॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कसुद्धा सई सारख्या 'ड्रीमफ्लोवर गर्ल' चा शोध एका कॉनटेस्ट तर्फे घेत आहे. जिला 'तू ही रे' टीमच्या उपकमिंग फिल्ममध्ये काम करण्याची संधीमिळणार आहे. पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कतर्फे दिग्दर्शक संजयजाधव यांना शुभेच्छा. 


"दुनियादारी आणि प्यारवाली लव्हस्टोरी सिनेमाच्यायशानंतर प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.  या दोन्ही चित्रपटांप्रमाणे तू ही रे सिनेमाही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल अशी खात्री मला वाटते आहे. यादोन्ही सिनेमाच्या टीमला तू ही रे मध्ये एका वेगळ्या रुपातमांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. सिनेमाची गाणी प्रेक्षकांनाआवडतील यात शंका नाही."  असं संजय जाधव यांनीसांगितलं तर "संजय जाधव यांनी तू हि रे सिनेमात मेहनतघेतली आहे. सिनेमातल्या अगदी बारीक सारीक गोष्टींवरलक्ष दिला आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीचआवडेल.  पॉंड्सने जी आम्हाला मदत आणि सपोर्ट केलाआहे त्यासाठी आम्ही पॉंड्सच्या सर्व टीमचे आभारीआहोत", असं मत सिनेमाच्या निर्मात्यांनी व्यक्त केल. पॉंड्स ड्रीमफ्लोवरच्या तू हि रे झिंगल्सने  स्वप्निल सईची जाहिरात अप्रतिम बनवली आहे.   

Comments

Popular posts from this blog

QNet launches New Luxury Chairos Watches

गोदरेज एंड बॉयस गोदरेज लॉकिम मोटर्स द्वारा चिकित्सा उपकरण कैलिब्रेशन सेवाओं के साथ भारत के स्वास्थ्य सेवा क्षेत्र की सुरक्षा

एस्टेक लाइफ साइंसेज ने आदि गोदरेज सेंटर फॉर केमिकल रिसर्च एंड डेवलपमेंट लॉन्च किया