रॉयल पाम इमारतींच्या डिम कनव्हेन्सची प्रक्रिया दोन महिन्यांमध्ये पुर्ण करण्याचा प्रयत्न

- गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे रहिवाशांना आश्‍वासन
- रॉयल पाम येथील इमारतीतील रहिवाशांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यासाठी शनिवारी घेतला जनता दरबार
- अंतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे बुझविण्यासाठी आमदार ङ्गंडातून रुपये १० लाख तसेच संरक्षण भिंतीसाठी रुपये ६० लाख मंजुर
मुंबई : 
सोसायटीच्या कनव्हेन्ससाठी आवश्यक ती कागदपत्रे रहिवाशंानी निबंधकाकडे जमा केल्यास, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रॉयल पाल्म येथील सोसायट्यांच्या कनव्हेन्सचा प्रश्‍न येत्या दोन महिन्यांमध्ये निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्‍वासन गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी शनिवारी येथील रहिवाशांना दिले. त्याचबरोबर पावसाळा गेल्यानंतर अंतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे बुझविण्यासाठी आमदार ङ्गंडातून रुपये १० लाख तसेच रॉयल पाल्म गेट ते स्लम यांच्यामधील संरक्षण भिंतीसाठी रुपये ६० लाख देत असल्याचेही वायकर यांनी यावेळी घोषित केले. 

गोरेगाव (पूर्व) मयुर नगर येथील रॉयल पाल्ममधील रहिवाशांना विकासकाकडून देण्यात आलेल्या अपुर्‍या नागरी सुविधांमुळे रहिवाशांना होत असलेल्या गैरसोयीबाबत राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी रॉयल पाल्म येथील एमरॉल्ड क्लब हॉल, येथे जनता दरबार बोलविला होता. या बैठकीला नगरसेविका रेखा रामवंशी, विश्वनाथ सावंत, शालीनी सावंत, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, मुख्य कार्यकारी अभियंता, आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  पाणी खाते, एसआरए, पोलीस विभाग, अदानी इलेक्ट्रीकसीटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, बेस्ट आदी विभागाचे अधिकारी तसेच रॉयल पाल्मचे रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

रॉयल पाल्ममधील रहिवाशांना भेडसावणारे विविध प्रश्‍नांची गार्‍हाणे रहिवाशंानी शनिवारी राज्यमंत्री यांच्या समोर मांडले. यात डिम कनव्हेन्स, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, अंतर्गत रस्ते, मालमत्ता कर, स्ट्रीट लाईट, बेस्ट वाहतूक, पोलीस बीट चौकी, ड्रेनेज लाईन, घनकचरा आदी समस्यांचा यात समावेश आहे. यासगळ्या प्रश्‍नांना उत्तर देताना वायकर यांनी, ज्या ज्या इमारतींना ताबा प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा सोसायटीतील रहिवाशांना प्रति माणसी १३५ लिटर इतके पाणी देण्यात येईल. तर अन्य इमारतींना ताबा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पाणी देण्यात येईल, असे सांगितले.

ज्या इमारतींना अद्याप कनव्हेन्स मिळालेला नाही, अशा सोसायट्यांना कनव्हेन्स मिळवून देण्यासाठी येत्या दोन महिन्यांमध्ये प्रयत्न करण्यात यईल. मात्र त्यासाठी इमारतीतील रहीवाशांनी डिमकनव्हेन्ससाठी आवश्यक ती कागदपत्रे निबंधकाकडे वेळीच सादर करावीत, अशी सूचनाही वायकर यांनी केली. इमारतींच्या मालमत्ता करासंदर्भात लवकरच हा प्रश्‍न निकाली काढण्यात येईल. आरेतील अंतर्गत रस्ते चांगल्यास्थितीत करुन रहिवाशांना दिलासा देण्यासाठी निश्‍चित मार्ग काढण्यात येईल. मात्र तेापर्यंत पावसाळा गेल्यानंतर आरेतील अंतर्गत रस्त्याच्या ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, ते बुजवून रस्ते सुस्थितीत करण्यासाठी आमदार ङ्गंडातून रुपये १० लाख रुपये देत असल्याची माहिती वायकर यांनी यावेळी दिली. 

त्याचबरेाबर रॉयल पाल्म गेट ते स्लम (युनिट नंबर ३०) यांच्यामधील रिटेनिंग वॉल बांधण्यासाठी आमदार निधीतून रुपये ६० लाख देत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. त्याचप्रमाणे आमदार ङ्गंडातून रॉयल पाल्ममधील प्रत्येक इमारतीला कचर्‍याचा डबा देण्यात येईल. रॉयल पाल्म येथील बाह्य व्यक्तींचा उपद्रव रोखण्यासाठी येथे लवकरच पोलीस बीट चौकी उभारण्यात येईल. ज्या महत्वाच्या ठिकाणी सीसी टीव्हीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने सीसी टीव्ही बसविण्यात येतील. रॉयल पाल्मची ड्रेनेजची लाईन महापालिकेच्या मुख्य ड्रेनेज लाईनला लवकरच जोडण्यात येईल, असे आश्‍वासनही वायकर यांनी यावेळी दिले. 

रॉयल पाल्मच्या मुख्य प्रवेशद्वारा लगतच बसणार्‍या अनधिकृत ङ्गेरीवाल्यांना आळा घालण्यासाठी महापालिका तसेच पोलीस प्रशासन यांनी त्वरित कारवाई करावी, अशी सूचना राज्यमंत्री वायकर यांनी यावेळी दिल्या. स्थानिकांच्या मागणीनुसार मयुरनगर येथे आमदार ङ्गंडातून बेस्टची शेड उभारण्यात येणार तसेच नवीन बेस्ट बसेस प्राप्त झाल्यावर बेस्ट बसेसच्या ङ्गेर्‍यांमध्ये निश्‍चित वाढ करण्यात येईल, असे आश्‍वासन बेस्टच्या दिंडोशी डेपोतील अधिकार्‍यांनी दिले. परंतु तोपर्यंत बेस्ट बसच्या मयुरनगर ते गोरेगाव स्थानक ङ्गेर्‍यांमध्येही वाढ करण्यात सुचना वायकर यांनी बेस्टच्या अधिकार्‍यांना दिल्या. त्यानुसार त्यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष यांच्या सोबत बोलणेही केले. त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेविका यासंदर्भात पाठपुरावा करावा, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.  रॉयल पाल्मच्या रस्त्यावरील जे जे दिवे बंद पडले आहेत ते येत्या महिन्याभरात सुरू करण्यात येतील, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. 

रॉयल पाल्म समस्या सोडविण्यासाठी राज्यमंत्री यांनी घेतलेले निर्णय :
१) बाह्य रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार ङ्गंडातून रुपये १० लाख मंजुर
२) रिटेनिंग वॉलसाठी आमदार ङ्गंडातून रुपये ६० लाख मंजुर
३) आवश्यक त्या ठिकाणी रीटेनिंग वॉल बांधणार.
४) मयुन नगर येथे बेस्टची शेड बांधणार.
५) ड्रेनेजची लाईन महापालिकेच्या मुख्य लाईनशी जोडणार
६) पोलीस बिट चौकी उभारणा
७) प्रत्येक इमारतीला एक कचर्‍याचा डबा देणार
८) महापालिका व पोलीस प्रशासनाने येथील ङ्गेरीवाल्यावंर कारवाई करावी.
९) रस्त्यांवरील दिव्यांचा प्रश्‍न लवकरच शक्य असल्यास महिन्याभरात सोडविणार.
१०) मालमत्ता कराचा प्रश्‍न लवकरच सोडविणार.
११) मयुर नगर येथील बेस्ट बसङ्गेर्‍यांमध्ये लवकरच वाढ.

Comments