एमजी मोटर इंडियाच्या दुसऱ्या फ्लॅगशीप एक्स्पिरियन्स स्टोअरचे उद्घाटन

~ दक्षिण मुंबईतील कारखरेदीचा अनुभव बदलण्याचा कार उत्पादक कंपनीचा प्रयत्न ~
मुंबई, १० ऑक्टोबर २०१९: कारखरेदीचा अनुभव संपूर्णपणे बदलण्यासाठी वचनबद्ध असलेल्या एमजी (मॉरिस गराजेस) मोटर इंडियाने आज मुंबईतील प्रभादेवी भागातील सिनर्जी आयटी पार्कमध्ये कंपनीचे दुसरे अधिकृत स्टोअर सुरू करत असल्याची घोषणा एका दिमाखदार सोहळ्यात केली.


या कार उत्पादक कंपनीने गुरुग्राममधील सेक्टर-१५ मध्ये असलेल्या माइलस्टोन एक्स्पिरिअन सेंटरमध्ये पहिले अधिकृत स्टोअर सुरू केले आहे. कार उत्पादकाचा ग्राहकांबद्दलचा भविष्यातील दृष्टिकोन आणि ब्रिटिश वारसा यांची झलक दोन्ही शोरूममध्ये दिसते आणि जाणवते. या नव्या ४००० स्क्वेअर फुटांच्या शोरूमच्या उद्घाटनानंतर कंपनीची मुंबईत एकूण ७ सेंटर्स झाली असून मार्च २०२० पर्यंत ११ सेंटर्स सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे.
भारतभरात १२० केंद्रांच्या माध्यमातून एमजी मोटर इंडियाचे जाळे उभे आहे, त्याचबरोबर या वर्षाअखेरीपर्यंत देशात २५० केंद्र उभारण्याचा कंपनीचा मनोदय आहे.
एमजी मोटर इंडियाचे मुख्य कमर्शियल अधिकारी गौरव गुप्ता म्हणाले, ''महाराष्ट्राप्रती आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून आम्ही राज्यात पहिले फ्लॅगशीप शोरूम सुरू करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. या अशा पद्धतीच्या एकमेवाद्वितीय फ्लॅगशीप एक्स्पिरियन्स स्टोअरमुळे भारतातील कारखरेदीचा पारंपरिक अनुभव पूर्णपणे बदलून जाणार आहे. ग्राहकांना इथे नव्या युगातील ग्राहकांच्या गरजांना अनुसरून असलेला रिटेल खरेदीमधील ताजा आणि उच्च दर्जाचा अनुभव घेता येणार आहे.''
एमजीच्या फ्लॅगशीप स्टोअरचा अनुभव हा आतापर्यंतच्या रूढ कार शोरूमच्या प्रतिमेला पूर्ण बदलणारा आहे. सर्व ग्राहकांना ताजा आणि आश्वासक असा ऑटोमोटिव्ह अनुभव देणारे हे स्टोअर ब्रँडच्या ‘इमोशनल डायनॅमिझम’ अर्थात, भावनिक गतिशीलता या तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे, ज्यामध्ये समकालीन ब्रँड एलिमेंट आणि स्लीक रंगसंगतीचा मिलाफ घडवून आणला आहे.

Comments

Popular posts from this blog

QNet launches New Luxury Chairos Watches

नान- शूगर स्वीटनरज़ प्रसिद्ध हो गए हैं: एफ आई सी सी आई सेमीनार मिथ को खत्म करता है और कम कैलरी वाले स्वीटनरज़ के स्वास्थ्य लाभों के बारे में बताता है

Pension Adalat