सोनी सबच्या 'जिजाजी छत पर हैं'मधील पंचम बनला ड्रॅक्युला

सोनी सबवरील प्रेक्षकांची आवडती 'जिजाजी छत पर हैं' ही मालिका प्रेक्षकांना टीव्हीसमोर अगदी खिळवून ठेवणारीत्यांना आकर्षित करणारी कथा नेहमीच देत असतेआताही या मालिकेत एक भन्नाट विनोदी घटना घडणार आहेहोळीचा सणमजामस्ती संपत आलेली असतानाच मुरारी (अनुप उपाध्यायइलायची (हिबा नवाबआणि पंचम (निखिल खुराणायांना रंगेहाथ पकडतो.
पंचम इलायचीला किस करणारच असतो इतक्यात मुरारी तिथे येतो आणि ते दोघे जागेवरच थिजून जातातपंचमला वाचवण्यासाठी मुरारीला गोंधळात टाकण्याचा विचार करून इलायची मुरारीला सांगते की, पंचम तिला किस करत नव्हताखरं तर पंचम ड्रॅक्युला बनला आहे आणि तो तिचं रक्त पिण्याचा प्रयत्न करत होतापंचमला थोडे पैसे देऊन त्याला इथून दूर पाठवण्याचा विचार मुरारी करतोमात्रपंचम त्याला व करुणाला (सोमा राठोड) घाबरवतो आणि त्यांच्या घरात राहू देण्यासाठी धमकावतोयामुळेपंचमवर वार करून त्याच्यातील ड्रॅक्युलाला संपवण्याचा निर्णय मुरारी घेतो.
मुरारीने पंचमला मारू नये म्हणून इलायची काय करेल?
मुरारीची भूमिका करणारे अनुप उपाध्याय म्हणाले, "मुरारी आपल्या मुलीला फारच जपतो आणि तो तिच्याबाबतीत फारच पझेसिव्हही आहेपंचम तिला किस करणार असतो हे पाहून त्याला धक्काच बसतो. पंचम ड्रॅक्युला आहेहे त्याला कळतं तेव्हा आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तो पंचमला ठार करण्याचा विचार करतोपंचम ड्रॅक्युला बनल्याचं नाटक करत असताना काय-काय घडतं हे पाहणं प्रेक्षकांसाठी मनोरंजक असेल."
पंचमची भूमिका साकारणारे निखिल खुराणा म्हणाले, "पंचमसोबत नेहमीच काहीतरी विचित्र घडतं आणि इलायची सतत भन्नाट कल्पना लढवत असतेतो इलायचीला किस करत असताना पकडला जातोत्यामुळे पंचम ड्रॅक्युला बनला आहेअसं नाटकं ते दोघं रचतातआसपासच्या माणसांना घाबरवत असताना तो स्वत:च संकटात सापडतोआगामी भागात प्रेक्षकांना मजेशीर घटना आणि भन्नाट हास्याचा डोस मिळणार आहे."
पाहत रहा 'जिजाजी छत पर हैं' सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता, फक्त सोनी सबवर

Comments

Popular posts from this blog

QNet launches New Luxury Chairos Watches

नान- शूगर स्वीटनरज़ प्रसिद्ध हो गए हैं: एफ आई सी सी आई सेमीनार मिथ को खत्म करता है और कम कैलरी वाले स्वीटनरज़ के स्वास्थ्य लाभों के बारे में बताता है

Pension Adalat