१५८-जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्र महायुतीचे उमेदवार रविंद्र दत्ताराम वायकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

शिवसेना-भाजपा-आरपीआय= (आ)-शिवसंग्राम-रयतक्रांती या महायुतीचे १५८ जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार रविंद्र दत्ताराम वायकर यांनी गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज इस्माईल युसुङ्ग येथील निवडणुक कार्यालयात भरला. यावेळी त्यांच्या सोबत खासदार गजानन किर्तीकर, विभागप्रमुख तसेच आमदार सुनिल प्रभू, नगरसेविका साधाना माने, नगरसेवक बाळा नर, भाजपचे नगरसेवक पंकज यादव, विभाग समन्वयक विश्वनाथ सावंत, रिपाई (आ) गटाचे ङ्गुलचंद कांबळे, सौ. मनिषा वायकर, पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Comments