मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजुंना मोङ्गत छत्री वाटप

- जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे अमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचा उपक्रम
मुंबई : 
सामाजिक सेवेसाठी नेहमीच अग्रेसर राहणारे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभा क्षेत्रातील गरजुंना मोङ्गत छत्र्यांचे वाटप केले. 

कोरोनाचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील अनेक शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन जनतेला आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. सामाजिक सेवा करताना यातील अनेक शिवसैनिक कोरोना बाधित झाली. परंतु ते डगमगले नाहीत. अनेक शिवसैनिक योद्धाप्रमाणे यातून बरे होऊन बाहेर आले आणि पुनश्‍च जनसेवेसाठी कामाला लागले आहेत. 

विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या तसेच शिवसैनिकांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे  आमदार रविंद्र वायकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त विधानसभा क्षेत्रातील गरजुंना मोङ्गत छत्र्या देण्यासाठी विधानसभा क्षेत्रातील सर्व शाखाप्रमुखांकडे छत्र्या सुपुर्द केल्या. यावेळी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, उपविभागप्रमुख के. एल. पाठक, जयवंत लाड, जितू वळवी, बाळा साटम, शाखाप्रमुख अमर मालवणकर, प्रदीप गांधी, नंदू ताम्हणकर, मंदार मोरे, संदिप गाढवे, नितीश म्हात्रे, शाखा समन्वयक उमेश कदम, अनिल म्हसकर आदी उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

QNet launches New Luxury Chairos Watches

नान- शूगर स्वीटनरज़ प्रसिद्ध हो गए हैं: एफ आई सी सी आई सेमीनार मिथ को खत्म करता है और कम कैलरी वाले स्वीटनरज़ के स्वास्थ्य लाभों के बारे में बताता है

Pension Adalat