जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्र

गणेश विसर्जनासाठी अतिरिक्त ३२ कृत्रिम विसर्जन स्थळे
- विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मागणी मनपाकडून मान्य
- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे तसेच गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिरिक्त कृत्रिम तलाव
- लोकमान्य टिळक सार्वजनिक विसर्जन तलावावरही होणार गणेशमुर्तींचे विसर्जन
मुंबई :
श्री गणरायाच्या विसर्जना दरम्यान होणार्‍या गर्दीवर नियमंत्रण मिळविण्याबरोबरच  सोशल डिस्टनसिंगचे काटेकोरपणे पालन करणे, पोलीस तसेच महापालिका प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी विधानसभा क्षेत्रातील विविध भागांमधील घरगुती तसेच सार्वजनिक मंडळाच्या गणेशाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्याची आमदार रविंद्र वायकर यांची मागणी मुंबई महानगरपालिकेने मान्य केली आहे. त्यानुसार आता जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात गणरायाच्या विसर्जनासाठी अतिरिक्त ३२ कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे. यामुळे यंदा या मतदार संघातील गणेशभक्तांना नैर्सगिक विसर्जन तलावाबरोबरच एकुण ३४ ठिकाणी श्री गणेशाचे विसर्जन करता येणार आहे. 
यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. के पूर्वमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण अधिक होते. मात्र आमदार वायकर, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच मुंबई महानगरपालिका यांनी केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोना रुग्णांची संख्या खुपच कमी झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यंदा गणशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. 
गणेश विसर्जनावेळी गणेशभक्त मोठ्याप्रमाणात विसर्जनस्थळांवर गर्दी करतात. अशावेळी सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन होणार नाही. त्यामुळे विधानसभा क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक वॉर्डात जेथे शक्य आहे ते दोन ते तीन कृत्रिम तलाव उभारल्यास विसर्जनादरम्यान गर्दी विखुरली जाईल. यामुळे पोलीस तसेच महापालिका प्रशासनास गर्दीवर नियंत्रण मिळविणे तर शक्य होईलच तसेच सोशल  डिस्टंन्सिगच्या नियमांचेही पालन होणार आहे. यामुळे अशाप्रकाराचे कृत्रिम तलाव उभारण्यात यावे, असे पत्र आमदार रविंद्र वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागाला दिले होते. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे लोकमान्य टिळक सार्वजनिक विसर्जन तलावाबरोबरच जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील विविध भागांमध्ये मिळून उभारण्यात येणार्‍या अन्य ३३ कृत्रिम तलावामध्ये गणेश भक्तांना गणेशाचे विसर्जन करणे शक्य होणार असल्याचे वायकर यांनी सांगितले. 

के पुर्व विभागातील विसर्जन स्थळे :
१) नैसर्गिक विसर्जन स्थळे : १
२) कृत्रिम वसर्जन स्थळे : १
३) अतिरिक्त निर्माण करण्यात येणारी कृत्रिम विसर्जन स्थळे : ३२

Comments

Popular posts from this blog

QNet launches New Luxury Chairos Watches

नान- शूगर स्वीटनरज़ प्रसिद्ध हो गए हैं: एफ आई सी सी आई सेमीनार मिथ को खत्म करता है और कम कैलरी वाले स्वीटनरज़ के स्वास्थ्य लाभों के बारे में बताता है

Pension Adalat