निधी मंजुर होऊनही कोर्टाच्या आदेशामुळे गौतम नगरच्या रस्त्याचे काम रखडले

 -आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत २०१८-१९ मध्येच येथील रस्त्यासाठी जिल्हाधिकारीकडून तब्बल २१ लाख रुपये मंजुर

- १६ ऑक्टोबर २०१८ रोजी टेंडरही काढले 
- जागेची मालकी असलेल्या श्री राम नगर ट्रस्ट नंबर.१ ने कोर्टाकडून स्टे घेतल्याने काम प्रलंबित

मुंबई :
स्थानिक जनतेच्या मागणीनुसार शासनाच्या माध्यमातून जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड ते गौतमनगरपर्यंत चांगला पक्का रस्ता बनविण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत २०१८-१९ तब्बल २१ लाख मंजुर करण्यात आले. परंतु या जागेच्या मालकीच्या ट्रस्टने कोर्टातून या कामासाठी स्टे घेतला आहे. त्यामुळे अद्याप रस्त्याचे काम करणे प्रशासनाला शक्य झाले नाही. 

जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड ते गौतमनगरपर्यंत पक्का रस्ता बनविण्यात यावा,अशी मागणी येथील रहिवाशांनी केली होती. गौतमनगरला जाण्यासाठी वहीवाटीची जागा असतानाही येथील जागा मालकाने वहीवाटीची जागाही रहिवाशंाना जाण्या येण्यासाठी मालकाने बंद केली होती. यावेळी रहिवाशांनी २००५ मध्ये आंदोलनही केले होते. त्यावेळी रविंद्र वायकर यांनी आंदोलकांना सामोरे जात हा वहीवाटीचा रस्ता असल्याने जागा मालकाला बंद करता येणार नाही, अशी भूमिका घेत रस्ता रहिवाशांसाठी सुरूच ठेवला होता. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून येथील रस्ता बनविण्यात यावा, यासाठी तत्कालिन नगरसेवक बाळा नर यांनी सुधार समितीत २०१४ ठरावही केला होता. दरम्यान येथे पक्का रस्ता बनविण्यात येऊ नये यासाठी श्री राम नगर ट्रस्ट नंबर-१ ने कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टानेही ही जागा ट्रस्टचीच असल्याचा निर्णय दिला. 

हा रस्ता शासनाच्या माध्यमातून करण्यात यावा, यासाठी स्थानिक आमदार विकास कार्यक्रमा अंतर्गत या ठिकाणी पक्का रस्ता बनविण्यासाठी २०१८-१९ मध्येच तब्बल २१ लाख रुपये मंजुरही करण्यात आले. या कामाचे टेंडरही काढण्यात आले. परंतु कामाचे टेंडर काढण्यात आल्यानंतर ट्रस्टने मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाला पत्र पाठवून ही जागा ट्रस्टची असून तसा आदेश कोर्टाने दिल्याने या ठिकाणी रस्ता बनविण्यात येऊ नये यासाठी पत्र पाठविले आहे. त्यामुळे आमदार रविंद्र वायकर यांनी आमदार निधीतून रस्त्यासाठी निधी मंजुर करुन घेतला असतानाही निव्वळ कोर्टाच्या आदेशामुळे येथील रस्त्यांचे काम रखडले आहे. 

Comments

Popular posts from this blog

QNet launches New Luxury Chairos Watches

नान- शूगर स्वीटनरज़ प्रसिद्ध हो गए हैं: एफ आई सी सी आई सेमीनार मिथ को खत्म करता है और कम कैलरी वाले स्वीटनरज़ के स्वास्थ्य लाभों के बारे में बताता है

Pension Adalat