अपोलो आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 सुरुवातीला जवळपास ९५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि दररोज जवळपास १०० लसी दिल्या जातील

नवी मुंबई, १६ जानेवारी २०२१:- अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगालसीकरण मोहिमेचा शुभारंभने लसीकरण मोहीम सुरु केली आहे. लसींची पहिली खेप पोहोचली असल्याने आज शहरात कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज आहे. अपोलो रुग्णालय नवी मुंबई येथे या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. 

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. दररोज जवळपास १०० लसी दिल्या जातील.  सुरुवातीला जवळपास ९५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. साधारण २-४ आठवड्यांनंतर किंवा निर्देश देण्यात आल्याप्रमाणे याच आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस दिला जाईल.  लसींची दुसरी खेप पोहोचली की अजून जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाईल. अपोलो हॉस्पिटल्समध्ये कोरोनाची पहिली लस श्री. वेंकटराम व्ही या फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱ्याला देण्यात आली. 

नवी मुंबई महानगरपालिकेचे माननीय आयुक्त श्री. अभिजित बांगर यांनी सांगितले, "नवी मुंबईमध्ये निवडण्यात आलेली सेंटर्स व विशेष प्रशिक्षित कर्मचारी यांच्या मार्फत कोविड-१९ लसीकरणाचा शुभारंभ होत आहे हे घोषित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. दररोज जवळपास १०० लसी दिल्या जातील आणि कोविड-१९ विरोधातील युद्धात आघाडीवर राहून लढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. सुरुवातीला साधारणपणे ९५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना निर्देशित मार्गदर्शक सूचनांनुसार लस दिली जाईल." 

लसीकरण अभियानासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे हे देखील आज नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटल्समध्ये उपस्थित होते. 

अपोलो हॉस्पिटल्स आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या सहयोगाबद्दल अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे युनिट हेड व सीओओ श्री. संतोष मराठे यांनी सांगितले, "अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई हे कोविड-१९ लसीकरणासाठी नियुक्त करण्यात आलेले पहिले खाजगी रुग्णालय आहे, याठिकाणी ४ लसीकरण बूथ आहेत.  अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई हे नवी मुंबईतील लोकांसाठी लसीकरणाची मोहीम सर्वतोपरी यशस्वी व्हावी आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने ही मोहीम सुरळीतपणे पार पडावी यासाठी सर्व आवश्यक पायाभूत सोयीसुविधांनी सज्ज आहे. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेसोबत हा उपक्रम हाती घेणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे."

Comments

Popular posts from this blog

QNet launches New Luxury Chairos Watches

गोदरेज एंड बॉयस गोदरेज लॉकिम मोटर्स द्वारा चिकित्सा उपकरण कैलिब्रेशन सेवाओं के साथ भारत के स्वास्थ्य सेवा क्षेत्र की सुरक्षा

एस्टेक लाइफ साइंसेज ने आदि गोदरेज सेंटर फॉर केमिकल रिसर्च एंड डेवलपमेंट लॉन्च किया