राकोल्ड प्रतिष्ठित 'बीईई' पुरस्काराने सन्मानित

 ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीने इलेक्ट्रिक स्टोरेज वॉटर हीटर विभागात राकोल्डला सलग दहाव्यादा सन्मानित केले

मुंबई, १९ जानेवारी २०२१: वॉटर हीटिंग उत्पादनांची भारतातील सर्वात मोठी कंपनी राकोल्डने 'मोस्ट एनर्जी एफिशियंट अप्लायन्स ऑफ द इयर २०२०' ('२०२० मधील सर्वाधिक ऊर्जा सक्षम उपकरण') बीईई पुरस्कार जिंकून आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे.  राकोल्डला हा पुरस्कार इलेक्ट्रिक स्टोरेज वॉटर हीटर विभागात देण्यात आला आहे.  हा पुरस्कार जिंकून राकोल्डने आपल्या उद्योगक्षेत्रात ऊर्जा सक्षमतेच्या मानकांच्या बाबतीत नवा मापदंड रचला आहे.  बीईई पुरस्कार दहाव्यांदा जिंकणारा राकोल्ड हा या विभागातील एकमेव ब्रँड आहे.

ऑनलाईन आयोजित करण्यात आलेल्या शानदार पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे माननीय ऊर्जा आणि नवीन व नूतनीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री व कौशल विकास आणि उद्यमशीलता मंत्री श्री. आर. के. सिंग यांच्या हस्ते ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी पुरस्कार ऍरिस्टोन थर्मो इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर व संशोधन व विकास प्रमुख यांना प्रदान करण्यात आला.  या कंपनीने सुरुवातीपासूनच ऊर्जा सक्षमता हे आपले शाश्वत प्रगतीचे धोरण म्हणून स्वीकारले असून ऊर्जा संवर्धन ही आपली वचनबद्धता मानली आहे.

ऍरिस्टोन थर्मो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री मोहित नरूला यांनी सांगितले, " राकोल्डच्या सुरुवातीपासूनच आम्ही शुद्ध आणि शाश्वत पृथ्वीसाठी प्रयत्नशील राहणे हे आमचे उद्धिष्ट मानत आलो आहोत.  आमच्या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण आणि स्टायलिश उत्पादने बनवत असताना ऊर्जा संवर्धन आणि सक्षमता यावर आमचा सर्वाधिक भर असतो. राकोल्डला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार बहाल करण्यात आला ही आम्हां सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. ऊर्जा संवर्धन आणि शाश्वतता यांच्याबद्दल आमची वचनबद्धता या पुरस्कारातून दर्शवली जाते."     

राकोल्डच्या २५ लिटर क्षमतेचा इलेक्ट्रिक स्टोरेज वॉटर हीटर म्हणजे डिझाईन, स्टाईल आणि ऊर्जा सक्षमता यांचा मिलाप आहे.  यामध्ये पर्यावरणस्नेही "झीरो ओडीपी' थर्मल इन्स्युलेशन आणि चकाकणारी एबीएस आऊटर बॉडी आहे जी उष्णता वाया जाण्यापासून रोखते, व आपल्या ५ स्टार ऊर्जा रेटींगचे पालन करते.  याबरोबरीनेच टायटॅनियम प्लस कोटेड इनर टॅंक यासारखी वैशिष्ट्ये गंजण्यापासून अधिक चांगले संरक्षण देतात तसेच दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता प्रदान करतात.  स्मार्ट मिक्समुळे अतिरिक्त गरम पाणी मिळवण्यातही ग्राहकांची मदत होते. आपल्या ग्राहकांसाठी शाश्वत, पर्यावरणस्नेही उत्पादने तयार करण्यासाठी या कंपनीने स्वतःला वाहून घेतले असून भारताला हवामान प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या वाटचालीत एक पाऊल पुढे आणण्यात कंपनी मोलाचे योगदान देत आहे.

भारतात ऊर्जा सक्षमतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि ऊर्जा संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी ऊर्जा मंत्रालयांतर्गत ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियंसी अर्थात बीईईची स्थापना करण्यात आली आहे. विविध उद्योगक्षेत्रांमध्ये ऊर्जा संवर्धनासाठी केले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि त्यामध्ये मिळवलेले यश तसेच बीईई स्टार लेबल्ड उपकरणांच्या उत्पादकांना बीईईतर्फे पुरस्कार दिले जातात.  बीईई पुरस्कार म्हणजे ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा सक्षमतेप्रती उद्योगांच्या वचनबद्धतेचा सन्मान आहे. बीईईकडून मान्यताप्राप्त ५ स्टार रेटेड वॉटर हीटर्स हे फक्त वीज बिलामध्ये बचत करण्यात मदत करतात इतकेच नव्हे तर ऊर्जा जपून ठेवण्यात देखील मदत करतात.

Comments

Popular posts from this blog

QNet launches New Luxury Chairos Watches

नान- शूगर स्वीटनरज़ प्रसिद्ध हो गए हैं: एफ आई सी सी आई सेमीनार मिथ को खत्म करता है और कम कैलरी वाले स्वीटनरज़ के स्वास्थ्य लाभों के बारे में बताता है

Pension Adalat