आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना गृहराज्यमंत्री सतेश पाटील यांचे लेखी उत्तर एचडीआयएलच्या मालमत्ताची विक्री करुन पीएमसी बँक लवकरच सुरू करणार

 - न्यायालयाने २५.११.२०१९ रोजी एच.डी.आय.एल कंपनीच्या मालकीचे ०२ ऐरोप्लेन  व एम प्रवासी हाज या चा लिलाव करण्याची संमती 

 - वधावन पालघर, नायगांव, वसई, विरार येथील मालमत्ता तसेच जंगम मालमत्ता त्यामध्ये १४ वाहने व २ प्रवासी जहाजे  ही ङ्गौजदारी दंड प्रक्रिया १०२ अन्वये जप्त 
- राकेश वधावन व सारंग वधावन यांचा अलिबाग येथील बंगला, जॉय थॉमस यांच्या पत्नीच्या नावे  पुणे येथील फ्लॅट तसेच गुन्ह्यातील आरोपी वरियाम सिंग यांची अमृतसर, पंजाब येथील हॉटेल ही 
- एच.डी.आय.एल व तिच्या गृप कंपनी ही पी.एम.सी. बँकेची सर्वात मोठी कर्जदार कंपनी असून सदर कंपनीने पी.एम.सी बँकेचे सन २००८ ते २०१९ या कालावधीत एकुण रुपये ६१२१.०७ कोटी एवढया रक्कमेचे लोन थकविले आहे.

मुंबई : 
रिझर्व्ह बँक ऑङ्ग इंडियाचे गर्व्हनर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आर्थिक गुन्हे विभाग व इनङ्गोर्समेंट डायरेकनटरेट यांची संयुक्त समिती एच.डी.आय.एल कंपनीच्या ज्या मालमत्ता पी.एम.सी बँकेकडे गहाण आहेत त्यांची विक्री करुन येणार्‍या रक्कमेचा भरणा पी.एम.सी बँकेत करुन पी.एम.सी बँक लवकरात लवकर सुरू करणार आहे. यासाठी संबंधी समितीकडून मालमत्तेच्या मुल्यांकनाचे काम सुरू असल्याची, लेखी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे. 

महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये २१ डिसेंबर २०१९ रोजी आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पी.एम.सी बँकेतील घोटाळ्यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यामुद्याच्या माध्यमातून त्यांनी पी.एम.सी बँकेतील घोटाळ्याची संपुर्ण माहिती सभागृहाला दिली. एवढेच नव्हे तर विविध पी.एम.सी बँकेचे ४३ खातेधारक ज्यांचे पी.एम.सी बँकेमध्ये ठेवी आहेत, त्यांना जो त्रास झाला त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. परंतु पैसे काढून न शकल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. एच.डी.आय.एलच्या मालमत्ताची विक्री करुन ही बँक पुन्हा सुरू करुन खातेदारकांना ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी रविंद्र वायकर यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे केली होती. 

यावर गृहराज्यमंत्री तसेज पाटील यांनी आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना पाठविलेल्या लेखी उत्तरात, एच.डी.आय.एल व तिच्या गृप कंपनी ही पी.एम.सी. बँकेची सर्वात मोठी कर्जदार कंपनी असून सदर कंपनीने पी.एम.सी बँकेचे सन २००८ ते २०१९ या कालावधीत एकुण रुपये ६१२१.०७ कोटी एवढया रक्कमेचे लोन थकविले आहे. पी.एम.सी बँकेचे कार्यकारी संचालक जॉय थॉमस सह बँकेचे कार्यरत संचालक मंडळ तसेच कर्मचारी यांनी जाणीवपुर्वक एच.डी.आय.एल कंपनीचे लोबाबत बँकेचे ऍडव्हान्स मस्टर इंडेन्ट ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये रिझर्व्ह बँक ऑङ्ग इंडिया यांना न देता जाणीवपूर्वक  सदरची माहिती लपवून ठेवली. यात बँकेने एच.डी.आय.एल व ग्रुप ऑङ्ग कंपनीचे जे मोठया रक्कमेचे ४४ लोन अकाऊंटह होते. त्याऐवजी आरोपीने सदरची लोनची रक्कम ही बनावट २१०४९ इतक्या खात्यांमध्ये थकित असल्याबाबत दाखविली  व सदरचे २१०४९ खाती ही कोर बँकिंग सोल्युशनमध्ये न दाखविता केवळ ऍडव्हान्स मस्टर इंडेंटमध्ये त्यांची नोंद करण्यात येऊन रिझर्व्ह बँक ऑङ्ग इंडिया  यांना ही ३१ मार्च २०१८ या संपलेल्या आर्थिक वर्षामध्येही इनस्पेक्शनसाठी हीच खोटी व चुकीची माहिती देण्यात आल्याचे पाटील यांनी वायकर यांना पाठविलेल्या  लेखी पत्रात नमुद केले आहे. 

एच.डी.आय.एल कंपनीची स्थावर मालमत्ता जी पी.एम.सी बँकेकडे गहाण ठेवून त्यावर कर्ज काढण्यात आलेले आहे. यात पालघर, नायगांव, वसई, विरार येथील मालमत्ता तसेच जंगम मालमत्ता त्यामध्ये १४ वाहने व २ प्रवासी जहाजे  ही ङ्गौजदारी दंड प्रक्रिया १०२ अन्वये जप्त करण्यात आलेली असल्याची नमुद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर राकेश वधावन व सारंग वधावन यांचा अलिबाग येथील बंगला, जॉय थॉमस यांच्या पत्नीच्या नावे  पुणे येथील फ्लॅट तसेच गुन्ह्यातील आरोपी वरियाम सिंग यांची अमृतसर, पंजाब येथील हॉटेल ही सी.आर.पी १०२ अन्वये ङ्ग्रीज करण्यात आली आहे. आरोपींची भारताबाहेरही मालमत्ता आहे का याची ही तपासणी करण्यात येत असल्याची पाटील यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे. 

न्यायालयाने २५.११.२०१९ रोजी एच.डी.आय.एल कंपनीच्या मालकीचे ०२ ऐरोप्लेन  व एम प्रवासी हाज या चा लिलाव करण्याची संमती दिली असल्याची माहिती पाटील यांनी पत्राद्वारे वायकर यांना कळविले आहे. 

एच.डी.आय.एल कंपनीची ज्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही, अशा मालमत्ता शोधणेकामी एस. के. वेसती जिउम नावाच्या कंपनची नेमणुक करण्यात आली आहे. सद्यस्थितीत पी.एम.सी बँक घोटाळ्याप्रकरणी एकुण १२ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. रिझर्व्ह बँक ऑङ्ग इंडियाने आर.बी.आय गर्व्हनर यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक गुन्हे विभाग व इनङ्गोर्समेंट संचालक यांची समिती नेमण्यात आली असून या कमिटीचे मुख्य काम एच.डी.आय. एल कंपनीच्या मालमत्ता पी.एम.सी बँकेकडे गहाण आहेत त्यांची विक्री करुन येणार्‍या रक्कमेचा भरणा पी.एम.सी बँकेत करुन पी.एम.सी बँक लवकरात लवकर सुरू करणे व त्या संबंधीत मालमत्तचे मुल्यांकन सुरू असल्याची लेखी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना लेखी पत्राद्वारे दिली आहे. 

Comments

Popular posts from this blog

QNet launches New Luxury Chairos Watches

नान- शूगर स्वीटनरज़ प्रसिद्ध हो गए हैं: एफ आई सी सी आई सेमीनार मिथ को खत्म करता है और कम कैलरी वाले स्वीटनरज़ के स्वास्थ्य लाभों के बारे में बताता है

Pension Adalat