'पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे 'प्युअर प्राईस ऑफर’चे दुसरे पर्व ( सीजन -२ ) सुरू

 ऑफरमुळे ग्राहकांना मिळेल, सोन्याच्या दरातील अनिश्‍चिततेपासून सुरक्षा


पुणे, ७ ऑक्टोबर २०२० : 'पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे आपल्या सर्व स्टोअर्स मध्ये 'प्युअर प्राईस ऑफर’चे दुसरे पर्व सुरू झाले आहे. ३ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर  २०२० दरम्यान प्री-बुकींग करणार्‍या ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येईल.

एकीकडे उत्सव व लग्नसराईचा काळ सुरू होत असताना, सोन्याच्या भावामध्ये होणार्‍या चढ-उताराचा प्रभाव कमी करण्याचा ब्रँडचा प्रयत्न आहे. उत्सव काळात सोन्याचे भाव वधारात असताना खरेदी करू की नये, या संभ्रमात ग्राहक नेहमी असतात. जरी सोन्याचे भाव वधारले तरी 'प्युअर प्राईस ऑफर' अंतर्गत बुकिंगवेळी असलेल्या भावाचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. तसेच जर सोन्याचे भाव बुकिंगच्या वेळी असलेल्या भावापेक्षा कमी झाले, तर ग्राहक कमी झालेल्या भावाचा फायदा घेऊ शकतात. दोन्ही परिस्थितीत ग्राहक पैसे वाचवू शकतात. वाढत असणाऱ्या सोन्याच्या दरांपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि सोन्याचा दर कमी झाल्यास त्याचा फायदा घेण्यासाठी ग्राहक गुंतवणुकीकरिता बुकिंग करू शकतात.

'पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, 'उत्सव काळात सोने खरेदी ही एक परंपरा आहे. दिवाळीपर्यंतच्या काळात सोन्याच्या भावांमध्ये वाढ होताना दिसते. मात्र सध्याची देशातील आर्थिक परिस्थिती आणि सोन्याच्या भावातील चढ -उतार यामुळे ग्राहक संभ्रमात आहेत. आमच्या ग्राहकांना चढ-उतार होणार्‍या सोन्याच्या दरांपासून सुरक्षितता पुरविण्यासाठी आणि सर्व प्रकारे त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.'

गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये सादर झालेल्या 'प्युअर प्राईस ऑफर'च्या पहिल्या पर्वाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सध्याच्या परिस्थितीमध्ये सोन्याच्या दरांमध्ये सतत होणारे चढ-उतारामुळे आम्ही आम्ही दुसरे पर्व घेऊन आलो आहोत. गेली १८७ वर्ष भारतातील आणि जगभरातील ग्राहकांनी आम्हाला नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांनी दर्शवलेल्या याच विश्वासामुळे आम्ही आमच्या परिसीमा ओलांडून अशा अनिश्चिततेच्या काळात त्यांच्यासाठी आणखी काय करता येईल, या भावनेने विविध उपक्रम राबवतो. उत्सव काळात फक्त अनिश्चिततेमुळे आणि सोन्याच्या भावातील चढ-उतारामुळे खरेदीची संधी कोणीही गमावू नये असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आम्ही ही ऑफर आमच्या ग्राहकांना धन्यवाद देण्यासाठी व आम्ही कायम त्यांच्या सेवेत तत्पर आहोत, हे सांगण्याकरिता आणि या उत्सव व लग्न सराईच्या काळात त्यांना सोने खरेदी सुलभ करण्यासाठी ही ऑफर आम्ही पुन्हा सादर केली असल्याचेही गाडगीळ यांनी  सांगितले.

Comments

Popular posts from this blog

QNet launches New Luxury Chairos Watches

नान- शूगर स्वीटनरज़ प्रसिद्ध हो गए हैं: एफ आई सी सी आई सेमीनार मिथ को खत्म करता है और कम कैलरी वाले स्वीटनरज़ के स्वास्थ्य लाभों के बारे में बताता है

Pension Adalat