जोगेश्वरी विक्रोळी वाहतुक कोंडी सुटणार सीप्झ गेट क्र.३ ते आरे रस्त्याला पदुम मंत्र्यांची मंजुरी
- पर्यटन व पर्यावरण, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून पार पडलेल्या बैठकीत जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मांडला प्रस्ताव
- बैठकीत आरेतील अनेक प्रलंबित प्रश्नांवर झाली चर्चा
मुंबई :
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड वरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सीप्झ गेट क्र.३ ते आरेमध्ये जाण्यासाठी पुर्वीपासून अस्तित्वात असलेला रस्ता सुरु करण्यात यावा यासाठी, या पर्यटन व पयावरण तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून पार पडलेल्या बैठकीत जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मांडलेल्या प्रस्तावाला पशु व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा रस्ता खुला झाल्यावर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
सध्या मेट्रो ६ व ७ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच हे दोन्ही मार्ग सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु सद्यस्थितीत जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्ता हा पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गांना जोडणारा रस्ता असल्याने या मार्गावरील वाहनचालकांना मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडींचा सामना करावा लागत आहे. या कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांना तसेच येथील रहिवाशांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील आरे कॉलनी या वनक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी पुर्वी एकूण चार प्रवेशद्वार होते व तेथून आरे कॉलनीमध्ये प्रवेश दिला जात होता. त्यात प्रामुख्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव आरे चेकनाका, पवई चेकनाका, विजयनगर मरोळ चेकनाका व आरे कॉलनी युनिट क्र.१९ मध्ये प्रवेश करण्यासाठी सिप्झ मुख्य प्रवेशद्वार क्र.३ येथे जुनी प्रवेश चौकी होती.
सीप्झ, अंधेरी या ठिकाणी अनेक कंपन्या असल्याने ठाणे, मुंबई पूर्व व पश्चिम उपनग तसेच शहरी भागातून अनेक कामगार येतात. या कंपन्यांमध्ये येणारे कामगार जोगेश्वरी विक्रोळी जोडरस्ता, पश्चिम द्रुतगती महामार्ग व आरे कॉलनी अशा तीन मार्गाचा वापर करावा लागतो. सिप्झ ते चर्चगेट व सीएसटी पर्यंत भुयारी मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे मेट्रोचे सिप्झ हे मुख्य स्थानक बनणार आहे. पूर्व ते पश्चिम उपनगर ते महामार्गावरुन खाजगी वाहनाने येणारे नोकरदार यांना सिप्झ येथून मेट्रोने चर्चगेट तसेच सीएसटी स्थानक गाठणे शक्य होणार आहे. यामुळे त्याच्या प्रवासाच्या वेळेत बचत तर होईल पण, परंतु जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील मोठ्याप्रमाणात वाहतुकीची कोंडी होणार आहे.
या मार्गावरील सकाळ व संध्याकाळ होणारी वाहतुकीच्या कोंडीपासून वाहनचालकांची सुटका करायची असेल तर सिप्झ मुख्य प्रवेश द्वार क्र्र. ३ समोरुन आरे कॉलनीमध्ये वाहनांना थेट प्रवेश मिळाल्यास जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येथील पुर्वी अस्तित्वात असलेला रस्ता पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव वायकर यांनी पर्यटन व पर्यावरण तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून पशु व दुग्ध विकास मंत्री सुनिल केदारे यांच्या उपस्थितीत संबंधित खात्याचे सचिव यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीत मांडला. त्यानुसार या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे. लवकर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे वायकर यांनी सांगितले.
Comments
Post a Comment