अपोलोने प्रकाशित केले पहिले 'कॉम्प्रेहेन्सिव्ह टेक्स्टबुक ऑफ कोविड-१९'

 मानवतेची सेवा करताना कोरोना विषाणूला बळी पडलेल्या हजारो आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना समर्पित


नवी मुंबई, १० जून २०२१: अपोलो हॉस्पिटल्सने आज पहिल्या 'कॉम्प्रेहेन्सिव्ह टेक्स्टबुक ऑन कोविड-१९' चे प्रकाशन केले.  हे अशा प्रकारचे पहिलेच पुस्तक असून याचे लेखन व संपादन अपोलो हॉस्पिटल्सचे सिनियर कन्सल्टन्ट - डिपार्टमेंट ऑफ पल्मनरी, क्रिटिकल केअर अँड स्लीप मेडिसिन डॉ. एम एस कंवर यांनी केले असून विविध विशेष विषयांमधील ७९ इतर वरिष्ठ आरोग्यसेवा प्रोफेशनल्सनी देखील या पुस्तकासाठी लेखन योगदान दिले आहे. डॉ. कंवर यांनी या पुस्तकाचे लेखन आणि संपादन केले असून ७९ इतर वरिष्ठ आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी देखील त्यामध्ये लेखन योगदान दिले आहे. या सर्वांनी गेले वर्षभर एकतर फ्रंटलाईनवर राहून किंवा सक्रिय कोविड केअरमध्ये काम केले आहे. हे पुस्तक ऍमेझॉनवर खरेदी करता येईल. 


या सर्वसमावेशक पुस्तकामध्ये कोरोना संबंधित क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स, अत्याधुनिक उपचार आणि प्रायोगिक थेरपीज यांचे अंतरंग उलगडून दाखवण्यात आल्यामुळे हे पुस्तक जगभरातील आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी कोविडसाठी दिले जाणारे उपचार व काळजी यांच्यात आमूलाग्र बदल घडवून आणेल. जगभरातील काही सर्वाधिक कोरोनाने प्रभावित देशांमधील राष्ट्रीय आरोग्य सेवांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळवण्यात आलेले नवीन अहवाल, सांख्यिकीय ज्ञान, शास्त्रोक्त माहिती यांच्या आधारे या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.  कोविड रुग्णांवरील उपचार आणि त्यांची काळजी घेण्यात सामना कराव्या लागलेल्या आव्हानांबरोबरीनेच कोविडसाठीचे लसीकरण, विविध प्रकारचे इतर आजार असलेल्या, रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांसाठी उपचार पद्धती, तसेच इतर न्यूरॉलॉजिकल, हृदयविकार, एंडोक्रिनल, किडनी या आजारांनी पीडित रुग्ण तसेच लहान मुलांमधील विविध आरोग्य समस्यांबरोबरीने कोरोनावरील उपचारांबाबत देखील या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे. क्लिनिकल व वैद्यकीय पद्धतींबाबत देण्यात आलेली अद्ययावत माहिती ही केवळ विशेषज्ञ व रेसिडेंट डॉक्टर्सना नव्हे तर वैद्यकीय विद्यार्थ्यांना देखील उपयुक्त ठरेल.  इंटरनिस्ट्स, क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट्स आणि तसेच सर्व संबंधित वैद्यकीय व सर्जिकल स्पेशलिस्ट्ससाठी देखील हे पुस्तक एक सुसज्ज संदर्भ म्हणून उपयोगात आणता येईल.


अपोलो हॉस्पिटल्सचे सिनियर कन्सल्टन्ट - डिपार्टमेंट ऑफ पल्मनरी, क्रिटिकल केअर अँड स्लीप मेडिसिन डॉ. एम एस कंवर यांनी सांगितले, "कोरोना महामारी ही गेल्या १०० वर्षात संपूर्ण मानवजातीला सोसावी लागलेली सर्वात अभूतपूर्व आणि सर्वात गंभीर समस्या आहे. वर्षभराहून अधिक काळापासून आपण सर्वजण कोरोना विरोधात लढत आहोत आणि दर दिवशी एक नवा धडा आपल्याला शिकायला मिळत आहे.  कोरोनावर सर्वोत्तम उपचार पुरवले जावेत आणि सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब केला जावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आरोग्यसेवा संघटना आणि कर्मचारी यांच्यात या संपूर्ण काळात अनन्यसाधारण परिवर्तन घडून आले आहे.  कोरोनाचे प्रकार, त्यासाठी वापरली जाणारी साधने आणि त्याचे व्यवस्थापन याबाबत वेगाने होत असलेल्या घडामोडी आणि दर महिन्याला येणाऱ्या नव्या मार्गदर्शक सूचना हे सर्व पाहता आम्हाला असे जाणवले की, एक सर्वसमावेशक, मार्गदर्शक पुस्तक तयार करावे जे आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना या आजाराबाबत सखोल माहिती देईल तसेच कोविडआधीच्या आणि कोविड होऊन गेल्यानंतरच्या विविध व्यवस्थापनाबाबत जसे, साईड इफेक्ट्स, दीर्घकालीन आरोग्य समस्या आणि लसीकरण याबाबत मार्गदर्शन करू शकेल.  या नव्या विषाणूने संपूर्ण जगभरात चिंता निर्माण केली आहे, खास करून आरोग्यसेवा कर्मचारी ज्यांना हा आजार, त्यावरील उपचार याविषयी सुस्पष्टता नसताना फ्रंटलाईनवर उभे राहून याच्याशी लढावे लागत आहे.  या लढाईत त्यांना स्वतःला संसर्ग होण्याचा खूप मोठा धोका आहे, आजवर या विषाणूने कित्येक हजारो आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचा बळी घेतला आहे.  मला खात्री आहे की, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील हे पुस्तक खूपच उपयुक्त ठरेल, या पुस्तकामुळे त्यांना एका विश्वसनीय स्रोताकडून तपशीलवार माहिती मिळवता येईल."

Comments

Popular posts from this blog

QNet launches New Luxury Chairos Watches

नान- शूगर स्वीटनरज़ प्रसिद्ध हो गए हैं: एफ आई सी सी आई सेमीनार मिथ को खत्म करता है और कम कैलरी वाले स्वीटनरज़ के स्वास्थ्य लाभों के बारे में बताता है

Vittiya Sashaktikaran Diwas