जोगेश्‍वरीचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी वेरावली जलाशयाची लेवल मेंटेन करा - वायकर

 - विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच  माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पाणी समस्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेचे अधिकार्‍यांसमवेत बोलावली बैठक

- जलाशयातील लिकेज बंद करावे
- वाढत्या लोकसंख्यनुसार नविन जलाशयाची निर्मितीची गरज
मुंबई : 
मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव भरले असतानाही जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. या विधानसभा क्षेत्राला वेरावली जलायशायतून पाणी पुरवठा करण्यात येतो. जलाशयातील पाण्याची लेवल मेंटेन होत नसल्याने चढणीवरील भागांतील घरांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे ही लेवल मेंटेन करण्याच्या सुचना जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना केली.

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील अनेक भागांमध्ये अपुर्‍या दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी स्थानिक जनतेने आमदार वायकर यांच्याकडेकेल्या होत्या. याची दखल घेत वायकर यांच्या अध्यक्षतेखालील कार्यालयात ही बैठक घेण्यात आली या बैठकीला नगरसेवक बाळा नर, प्रविण शिंदे, विधानसभा संघटक विश्‍वनाथ सावंत, शालिनी सावंत, उपविभागप्रमुख कैलासनाथ पाठक, जयवंत लाड, जितेंद्र वळवी, बाळा साटम, शाखाप्रमुख मंदार मोरे, सुभाष मांजरेकर, नंदु ताम्हणकर, प्रदीपक गांधी, अमर मालवणकर, नितेश म्हात्रे, समन्वयक बावा साळवी व भाई मिर्लेेकर, महापालिकेचे जलअभियंता एस.आर. आर्के, के.पूर्वचे अधिकारी एस.आर.एचे अधिकारी एस.आर. टांक आदी उपस्थित होते. 

विधानसभा क्षेत्रातील जनतेला होणार्‍या अपुर्‍या पाणी पुरवठ्याबाबत जनतेची म्हणणे ऐकल्यावर जलअभियंता आर्के यांनी,‘तानसा मुख्य जलवाहीनीवर ७ लिकेजेस निर्माण झाली असून, हे लिकेजेस बंद करण्याचे काम लवकर हाती घेण्यात येणार असल्याची सांगितले. सुभाष नगर येथील नवीन पाण्याची लाईन प्रस्तावित करण्यात आली असून एसआरएकडून मंजुरी मिळाल्यास ती लाईन टाकण्यात येईल. हरीनगर व शिवाजी नगर येथील विकासकाचे नवीन काम थांबवण्यात आले आहे, अशी माहिती उपस्थितांना दिली. 

विधानसभा क्षेत्रातील जनतेला पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यासाठी जलशयातील पाण्याची लेवल मेंटेन करण्यात यावी, जोगेश्‍वरीला पाणी पुरवठा करणार्‍या जलाशयातील ज्या ठिकाणी लिकेजेस आहे ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी तसेच जलाशयात माती भरली आहे ती काढण्यात आल्यास अतिरिक्त पाणीसाठा करणे शक्य होईल, असे मत वायकर यांनी यावेळी व्यक्त केले. विधानसभा क्षेत्रातील ज्या ठिकाणी अनधिकृत पाण्याची कनेक्शन देण्यात आली आहेत, ती सर्व तोडून तेथील जनतेला अधिकृतपणे कनेक्शन देण्यात यावी, अशी सुचनाही वायकर यांनी यावेळी केली. भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन तसेच विविध विभागाचा होणारा विकास बघता महापालिकेने नविन रिझर्व वायर बांधण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

Comments

Popular posts from this blog

QNet launches New Luxury Chairos Watches

नान- शूगर स्वीटनरज़ प्रसिद्ध हो गए हैं: एफ आई सी सी आई सेमीनार मिथ को खत्म करता है और कम कैलरी वाले स्वीटनरज़ के स्वास्थ्य लाभों के बारे में बताता है

Pension Adalat