जोगेश्वरीतील संत शिरोमणी गाडगेबाबा मार्ग १५० ङ्गुटांचा होणार
राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते पार पडले सेवा रस्त्यांचे भूमीपूजन
- २ वर्षांमध्ये काम पुर्ण
- सेवा रस्त्याच्या कामासाठी रुपये ६८ कोटी मंजुर
- रस्ता रुंदीकरणाच्या कामातील बाधितांना पर्यायी जागा देणार
मुंबई :
गेली अनेक वर्षे रखडलेल्या संत शिरोमणी गाडगेबाबा मार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला उसून लवकरच हा रस्ता १५० ङ्गुटांचा होणार आहे. गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते या सेवा रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन शनिवारी करण्यात आले. लवकरच या कामास सुरूवात होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मेट्रोच्या कामामुळे संत शिरोमणी गाडगेबाबा मार्ग (जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड) येथील वाहतुकीत वाढ झाल्याने येथील रहिवाशांना रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत हा रस्ता १०० ङ्गुटांचा असून तो १५० ङ्गुटांपर्यंत वाढविण्यात आल्यास येथील वाहतुकीची कोंडी सुटण्यास बर्याच अंशी मदत होणार आहे. त्यामुळे येथील रस्ता दोन्ही बाजुला २५ ङ्गुटांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या रस्त्याचे काम तात्काळ सुरू व्हावे, तसेच येथील रहिवाशांना वाहतुकीच्या कोंडीपासून सुटका मिळाली यासाठी राज्यमंत्री वायकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकार्यासमवेत अनेक बैठका घेऊन रस्ता रुंदीकरणाच्या कामात येणार्या अडचणी दूर केल्या. त्याचबरोबर नगरसेवक बाळा नर व प्रविण शिंदे यांनी देखील या रस्ता रुंदीकरणाच्या सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या रस्त्याच्या रुदीकरणासाठी सुमारे ६८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून हे काम दोन वर्षांमध्ये पुर्ण करण्यात येणार आहे. येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामातील बाधितांना पर्यांयी जागा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिली. सद्यस्थितीत हा रस्ता १०० ङ्गुटांचा असून तो १५० ङ्गुटांचा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज पार पडलेल्या भूमीपुजन सोहळ्यात विभाग संघटक विश्वनाथ सावंत, नगसेवक प्रविण शिंदे, बाळा नर, माजी नगरसेविका मंजिरी परब, उपविभागप्रमुख कैलाश पाठक, शाखाप्रमुख मंदार मोरे, नंदू ताम्हणकर, प्रदिप गांधी, रचना सांवत, प्रियंका आंबोळकर, मुंबई महानगरपालिकेचे अभियंता उपस्थित होते.
Comments
Post a Comment