संकल्प माघी गणेश जयंतीचे १० वे वर्ष ‘स्वच्छ भारत’ मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियान
- उपमहापौर सुहास वाडकर यांच्या उपस्थितीत रहिवाशांच्या श्रमदानाने अभियानास सुरूवात
- महिनाभर विविध १० कार्यक्रमाचे आयोजन
- खाद्य महोत्सव, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा, क्रिडा महोत्सव, ग्रुप डान्स, दिप महोत्सव, रक्तदान शिबीर, होम मिनिस्टर, मराठी वाद्यवृंदाच्या कार्यक्रमांचा समावेश
- संकल्प सहनिवास ङ्गेडरल को. ऑ. सोसायटी, सांस्कृतिक मंडळ, महिला मंडळ तसेच युवा संकल्पच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई :
संत गाडगेबाबा महाराज यांनी स्वच्छतेचा संदेशत दिला....किर्तनाच्या माध्यमातून जनतेमध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.... नुसता संदेश दिला नाही तर स्वत: हातात खराट घेत स्वच्छतेला सुरूवात केली...त्यांचेच हे कार्य पुढे नेण्यासाठी नागरी निवारा येथील संकल्प सहनिवास ङ्गेडरल को. ऑङ्ग. संकल्प ङ्गेडरल सहनिवास सोसायटीतर्ङ्गे संकुलात आज ‘स्वच्छ भारत’ मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियान रहिवाशांच्या श्रमदानाने राबविण्यात आले. या मोहीमेत उपमहापौर सुहास वाडकरही सहभागी झाले होते. निमित्त होते संकल्पतर्ङ्गे आयोजित करण्यात येणार्या ‘माघी गणेश जयंती’ उत्सवाच्या १० व्या वर्षातील पदार्पणाचे.
विविध सामाजिक कार्यक्रमासाठी गोरेगाव नागरी निवारा येथील संकल्प सहनिवास ङ्गेडरल को. ऑप. सोसायटी नेहमीच अग्रेसर असते. दरवर्षी या संकुलात विविध कार्यक्रमांबरोबरच ‘माघी गणेश जयंती’चे उत्सवाचे मोठया धुमधडाक्यात आयोजन करण्यात येते. यंदा या महोत्सवाचे १० वर्ष असल्याने २९ डिसेंबर २०१९ ते २८ जानेवारी २०२० पर्यंत सलग १० भरगच्च अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय संकल्प सहनिवास ङ्गेडरल, संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ, महिला मंडळ तसेच संकल्प युवा यांनी घेतला आहे.
या १० विविध कार्यक्रमामध्ये स्वच्छता अभियानाचाही समावेश होता. त्यानुसार या महोत्सवाची २९ डिसेंबरपासून स्वच्छता अभियानाने करण्यात आली. सकाळी ७ पासून सुरू झालेल्या या स्वच्छता अभियानात संकल्पमधील ज्येष्ठ नागरिक, पुरुष, महिला तसेच लहानमुले, मुंबई महानगरपालिकेच्या सङ्गाई विभाग तसेच दत्तक वस्ती योजनेचे कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी लहानमुलांबरोबरच मोठ्यांनीही हातात ‘स्वच्छ संकल्प...सुंदर संकल्प’, ‘करुया कचरा कमी...मिळवूया आरोग्याची हमी’,‘धरुया पर्यावरणाची कास...करुया संकल्पचा विकास’ आदी संदेश देणार्या पाटया हातात धरुन रहिवाशांमध्ये जनजागृती केली.
संकल्प ‘माघी गणेश जयंती’च्या १० व्या उत्सवानिमित्त आयोजित १० कार्यक्रमांमध्ये खाद्य महोत्सव, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रिडा महोत्सव, हळदीकुंकु, दिप महोत्सव, मराठी वाद्यवृंदाचा कार्यक्रम, समुह नृत्य, रक्तदान शिबीर, होम मिनिस्टर, बक्षिस वितरण समारंभ आदी कार्यक्रम २७ जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आले असून २८ जानेवारीला ‘माघी गणेश जयंती’ संकुलात साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.
Comments
Post a Comment