संकल्प सहनिवास माघी गणेशाचे १० वे वर्ष धुमधडावक्यात साजरे
मुंबई :

यंदाचे संकल्प सहनिवास माघी श्री गणेशाचे १० वे असल्याने महिनाभर विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात गितगायन, नृत्य, रक्तदान शिबीर, कॅरम, चित्रकला, बुद्धबळ, पुरूष व महिलांचे क्रिकेट सामने, होम मिनिस्टर आदि कार्यक्रमांचा यात समावेश होता. या महोत्सवाला सङ्गाई अभियानाने सुरुवात झाली.
गणेश जन्माच्या दिवशी होम हवन, गणेश याग, अथर्वशिर्ष पठण, सत्यनारायणाची पुजाही पार पडली. सायंकाळी ६ वाजता श्री गणेशाची भव्य पालखी मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला व पुरूष पारपारिक मराठमोळ्या वेषात सहभागी झाली होती. ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महिला, पुरुष व लहानमुले बेधुंत होऊन नाचत होते. दरवर्षी प्रमाणेही यंदाही खासदार गजानन किर्तीकर, आमदार तसेच विधिमंडळाचे शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू, उपमहापौर ऍड.सुहास वाडकर, नगरसेवक तुळशीराम शिंदे, मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली हजेरी लावली.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी संकल्प सहनिवासमधील रहिवाशांबरोबरच संकल्प सहनिवास ङ्गेडरल सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत माने, सचिव प्रदिप केदारे, संकल्प सांस्कृतिकचे अध्यक्ष धनंजय पानबुडे, सचिव अजय पवार, संकल्प सहनिवास महिला मंडळाच्या अध्यक्षा संजिवनी पानबुडे, सचिव निकीता साटम तसेच यातील अन्य पदाधिकारी तसेच सदस्य यांनी खुप मेहतन घेतली.
Comments
Post a Comment