जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्र

‘शाब्बास वहिनी’ची अंतिम ङ्गेरी रविवारी
- रविवार सायंकाळी ५ वाजता स्पर्धेला इच्छापुर्ती रंगमंच, शामनगर तलाव येथे सुरुवात
- आठ शाखांमधून आठ वहीनींची अंतिम ङ्गेरीसाठी निवड
- शाखा निहाय घेतलेल्या पॉवर शेङ्ग तसेच अन्य स्पर्धेतील विजेत्यांना मिळणार पुरस्कार
मुंबई :
महिलांमधील कला तसेच क्रीडा गुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्यातील कौशल्य जनतेसमोर सादर करुन त्यांचे नाव लौकीक करण्याच्या उद्देशाने जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘शाब्बास वहिनी-२०२०’ ची अंतिम ङ्गेरी ८ मार्च रोजी अष्टरंगी होणार आहे. विधानसभा क्षेत्रातील आठ शाखांमधून घेण्यात आलेल्या या स्पर्धेतून अंतिम ङ्गेरीसाठी पात्र ठरलेल्या आठ महिलांमधून कुठली वहिनी मानाची पैठणी पटकावून जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात ‘शाब्बास वहिनी-२०२०’चा किताब पटकविणार याकडे जोगेश्‍वरीवासीयांचे लक्ष लागले आहे. 
८ मार्चच्या ‘जागतिक महिला दिना’च्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच मा.राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्य संयोजिका मनिषा वायकर यांच्या नेतृत्वाखाली विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी प्रमाणेच यंदाही जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील आठही प्रभागांमधून ‘शाब्बास वहिनी’ ची प्राथमिक ङ्गेरी पार पडली. तर विधानसभा क्षेत्रातील पाककलेतील निपुण महिलांना त्यांचे पाककलेतील कौशल्य दाखवता यावे यासाठी आयोजित ‘मास्टर शेङ्ग’ ही स्पर्धेही घेण्यात आली होती. त्याचबरोबर मुली, महिला तसेच ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी ‘रॅम्पवॉक’ स्पर्धा शाखा निहाय घेण्यात आली. यात जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील आठ शाखा मिळून हजारो महिलांनी विविध स्पर्धेत सहभाग घेतला.
अंतिम ङ्गेरीसाठी पात्र शाब्बास वहिनी: 
अंतिम ङ्गेरीसाठी आठ शाखांमधून ८ महिला स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. यात सुचिता कुंबल (शाखा क्र.५२), प्रमीला यादव (शाखा क्र. ५३), प्रिया पडवेलकर (शाखा क्र.७२), लता कांबळे (शाखा क्र. ७३), सुषमा कोलेकर (शाखा क्र. ७४), रोहिनी सारंगे (शाखा क्र. ७७), स्वाती सुर्यवंशी (शाखा क्र.७८) व रेखा गावडे (शाखा क्र.७९) यांचा समावेश आहे. 
 जोगेश्‍वरीतील आठही प्रभागांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘शाब्बास वहिनी-२०२०’च्या प्राथमिक ङ्गेरीत अनोख्या अशा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे ८ मार्च रोजी पार पडणार्‍या अंतिम ङ्गेरीमध्ये कुठल्या अनोख्या स्पर्धां ठेवण्यात आल्या आहेत? ‘शाब्बास वहिनी-२०२०’ या किताबावर यंदा कुठल्या प्रभागातील महिला आपले नाव कोरुन पैठणीचा मान पटकाविणार याकडे जोगेश्‍वरीवासीयांचे लक्ष लागले आहे.  ८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता इच्छापुर्ती गणेश मंदिर, जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड, शामनगर तलाव, जोगेश्‍वरी (पुर्व) येथे  ‘शाब्बास वहिनी-२०२०’ ची अंतिम ङ्गेरी पार पडणार आहे. 

Comments