अंधश्रद्धेचा बळी ठरलेल्या मित्राची भावनीक गोष्ट 'पिटर'
'पिटर' चित्रपट २२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय
मुंबई, २७ डिसेंबर २०२०:- आनंदी इंटरप्रायझेस ची ही पाहिली निर्मिती असून हिंदी इंडस्ट्री मधील नामांकित निर्मिती संस्था आणी डिस्ट्रुबिशन कंपनी 'जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड' हा चित्रपट प्रेझेंट करत आहे. याचे निर्माते अमोल अरविंद भावे आहेत यांनी अत्ता प्रयन्त सात चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन केले असून ४५ टीवी मालिकांचे देखील दिग्दर्शन, लेखन केले आहे त्यांच्या बरोबर दिप्पांकर रामटेके आणी रोहनदीप सिंह हे या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत.
चावंड गावच्या निसर्गरम्य गावात 'पिटर' चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. मनोरंजना सोबतच अंधश्रद्धेवर प्रकाश टाकणारा हा भावनिक सिनेमा.शेवटी प्रेक्षकांना सिनेमातून मांडलेल्या मुद्यावर विचार करायला लावेल अशी दिग्दर्शक अमोल भावे यांना आशा आहे. चित्रपट २२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय जास्तीत जास्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहावा.
Comments
Post a Comment