आरेतील आगीच्या घटनांची सखोल चौकशी करा व घटनेनंतर त्या ठिकाणची सद्यस्थिती काय आहे याचीही माहिती घ्या

 - जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी आयुक्त, वरळी दुग्धशाळा यांना पाठविले पत्र

- आरेतील पुर्वीचे अग्निशमन केंद्र सुविधांसह कार्यान्वित करण्याची सुचना 
- चित्रनगरीतील शुटींगनंतर सेटही त्याच ठिकाणी टाकण्यात येतात.

मुंबई : 

गेल्या काही वर्षांमध्ये आरेमध्ये अचानक आगी लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने याची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच आगीच्या घटनानंतर त्या ठिकाणची सद्य परिस्थिती काय आहे, याची महिती घेण्यात यावी, असे पत्र जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी आयुक्त, वरळी दुग्धशाळा यांना पाठवले आहे. 

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातीलआरे कॉलनी, गोरेगाव पुर्व येथे ङ्गेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मार्च १५ पर्यंत जवळ जवळ १५ हून अधिक आकस्मित आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. अग्निशमन दलाच्या अहवालानुसार आरेमध्ये वर्षभरात २७ वेळा आगी लागल्याचे नमुद करण्यात आले आहे. दिवसा गणिक आरेत आकस्मित आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे येथील पर्यावरणाची हानी होत असून जंगले नष्ट करण्याचा हा प्रकार असल्याचे निदर्शनास येत आहे. या ठिकाणी आगी लागतात की लावल्या जातात? की जागा बळकावण्याचा प्रयत्न होतोय याची सखोल चौकशी आरे प्रशासनाकडून करण्यात यावी, यात जर कुणी दोषी सापडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे वायकर यांनी पत्रात नमुद केले आहे. 

आरेमध्येच चित्रनगरी असल्याने चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी उभारलेले अनेक सेट्‌स शुटींग संपल्यानंतर सेट्‌स काढून आरेच्या परिसरातच टाकले जातात, असे ही निदर्शनास येत आहे. आरेच्या ज्या ज्या भागांमध्ये अचानक आगी लागल्या आहेत, त्या भागाची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती आरे प्रशासनाने घ्यावी. आरेमधील ८०० एकर जागा महाराष्ट्र शासनाने जंगल म्हणुन घोषित केल्याने या वनक्षेत्राच्या सुरक्षेसाठी अग्नी व्यवस्थापन योजना राबविणे ही तेवढेच महत्वाचे आहे. यामुळे सुरवातीस आरेमध्ये अग्निशमन केंद्र होते ते पुन्हा सुविधांसहित सुरू करण्यात यावे, जेणे करुन येथे अचानक लागणार्‍या आगीच्या घटनांवर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य होईल तसेच जंगलाची हानी होणार नाही, असे ही वायकर यांनी वरळी दुग्धशाळा आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे. 

Comments

  1. Good article about astrology
    Pandith Rudra is a renowned Famous, Top and Best Indian Astrologer in New York who provides astrological services such as Black Magic Removal, Psychic Reading, Ex Love Back, Husband & wife Relationship Problems, Love Specialist and Jealousy and Curse Removal. His followers have earned more benefits through his best forecasting and even after their problem solved, they meet him and ask him some general questions as a family member.
    Best Astrologer in New York

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

QNet launches New Luxury Chairos Watches

खोतांच्या घराला लागलेले पंचक सुटणार ? उत्सुकता वाढवणारा 'पंचक' चा ट्रेलर प्रदर्शित

बड़ा अपडेट: नए सिंगिंग रियलिटी शो 'भारत का अमृत कलश' के मेजबान के रूप में प्रीतम प्यारे ने एक नई यात्रा शुरू की!