एमएसएन लॅबोरेटरीजची 'फेवीलो ८०० एमजी' टॅब्लेट्स कोरोनाला मात देणार

 कोरोनामुळे आलेल्या सौम्य-मध्यम तापावर उपचार म्हणून ‘फेवीलो ८०० एमजी’ टॅब्लेट्स उपयुक्त आहे

मुंबई, २८ एप्रिल २०२१:- एमएसएन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड (एमएसएन लॅब्स) या भारतातील आघाडीच्या एकीकृत फार्मास्युटिकल कंपनीने कोरोनामुळे आलेल्या सौम्य व मध्यम तापावर उपचार म्हणून फेवीपिरवीर या अँटिव्हायरल औषधाच्या कमतरतेची समस्या दूर करण्यासाठी आपल्या ब्रँडेड जेनेरिक फेवीलो ८०० एमजी टॅब्लेट्सची घोषणा केली आहे. फेवीलो ८०० एमजी प्रत्येक फार्मसीमध्ये हे औषध उपलब्ध असणार आहे. देशात कोरोनाच्या केसेस प्रचंड प्रमाणात वाढत आहेत, अशावेळी रेमडेसिवीर, ओसेलटॅमिवीर आणि कोरोनाशी संबंधित इतर महत्त्वाच्या औषधांची उपलब्धता हे खूप मोठे आव्हान बनले आहे. रुग्णांच्या सुविधेसाठी एमएसएन लॅब्सची फील्ड टीम देखील स्थानिक रिटेल केमिस्ट्सच्या सहयोगाने १७० पेक्षा जास्त शहरांमध्ये फेवीलो ८०० एमजी औषध घरपोच करण्याची सेवा मोफत देण्यासाठी मदत करत आहे. 


एमएसएनने फेवीपिरवीरचे जगातील सर्वात किफायतशीर ब्रँडेड जेनेरिक फेवीलो (२०० व ४०० एमजी) गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात बाजारपेठेत दाखल केले.  एमएसएनचा असा दावा आहे की, औषधाची ताकद अधिक जास्त असल्यामुळे रुग्णाला दर दिवशी घ्याव्या लागणाऱ्या टॅब्लेट्सची संख्या कमी होऊन रुग्णांकडून औषधे व्यवस्थित घेतले जाण्याचे प्रमाण आणि त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या अनुभवात सुधारणा होईल. हे औषध उपलब्ध करवून दिले जात असल्याने कोरोना वरील औषधांच्या कमतरतेमुळे रुग्णांना सहन कराव्या लागत असलेल्या समस्या देखील दूर होतील.


एमएसएन ग्रुपचे सीएमडी डॉ. एमएसएन रेड्डी यांनी सांगितले, "भारतात कोविड-१९ च्या केसेस वाढत असल्यामुळे त्यावर नियंत्रणासाठी उपचारांचे किफायतशीर पर्याय उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे.  आम्हाला खात्री आहे की, फेवीलो ८०० हे आमचे उत्पादन कोविडच्या विरोधातील लढाईत देशाचे बळ वाढवेल."


एमएसएनच्या फेवीपिरवीर ८०० एमजीच्या अधिक जास्त स्ट्रेंथला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डिसीजीआय) मान्यता दिली आहे.  एमएसएनने फेवीलो ८०० एमजीसाठी ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडिएंट (एपीआय) आणि फॉर्म्युलेशन आपल्या स्वतःच्या संशोधन व विकास आणि उत्पादन युनिट्समध्ये यशस्वीपणे विकसित केले आहे.  फेवीलोचे एपीआय व एफडीएफ हे आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानकांना अनुसरून आहे.

Comments

Popular posts from this blog

QNet launches New Luxury Chairos Watches

खोतांच्या घराला लागलेले पंचक सुटणार ? उत्सुकता वाढवणारा 'पंचक' चा ट्रेलर प्रदर्शित

बड़ा अपडेट: नए सिंगिंग रियलिटी शो 'भारत का अमृत कलश' के मेजबान के रूप में प्रीतम प्यारे ने एक नई यात्रा शुरू की!