डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. स्वाती वाव्हळ तसेच गिरीश शरणाथे यांचा मायक्रोबायोलॉजी सोसायटी इंडियाच्यावतीने सत्कार

 मुंबई : 

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. स्वाती वाव्हळ यांची तसेच महाराष्ट्र राज्याच्या मेडिकल प्रयोगशाळा नियमन समितीवर गिरीश शरणाथे यांची निवड करण्यात आल्याबद्दल मायक्रोबायोलॉजी सोसायटी इंडियाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर मृणालिनी ङ्गडणवीस यांच्या हस्ते या दोघांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील एका महिला कुलगुरूंनी दुसर्‍या कुलगुरूंचा सत्कार करण्याचा दुग्धशर्करा योग यानिमित्ताने जुळुन आला. 

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. मृणालिनी ङ्गडणवीस यांनी,‘मायक्रोबायोलॉजी विषयाला जास्तीत जास्त व्यवसायाभिमुख करण्यासाठी अभ्यासक्रमात आवश्यक बदल करण्यात यावे, असे आवाहन उपस्थितांना केले. मायक्रोबायोलॉजी सोसायटी इंडियाच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संजीव पाटणकर यांनी कार्यक्रमाचे रुपरेषा विषद केले. सोसायटीचे राष्ट्रीय अद्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. मायक्रोबायोलॉजी सोसायटी इंडियातील सदस्यांकडून मायक्रोबायोलॉजी विषयाची वाढ होण्यासाठी  सदस्यांनी अधिक जोमाने कार्य करावे, असे आवाहन केले. डॉ. स्वाती वाव्हळ यांचा महाविद्यालयीन शिक्षक ते विद्यापीठाचे कुलगुरू व गिरीश शरणाथे यांचा सामान्य कुटुंबातील साधारण विद्यार्थी मे मडिकल प्रयोगशाळा नियमन समिती सदस्य हा प्रवास उपस्थित विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत, डॉ. बेला नायर यांनी आभार प्रदर्शन करताना व्यक्त केले. 

Comments

Popular posts from this blog

QNet launches New Luxury Chairos Watches

गोदरेज एंड बॉयस गोदरेज लॉकिम मोटर्स द्वारा चिकित्सा उपकरण कैलिब्रेशन सेवाओं के साथ भारत के स्वास्थ्य सेवा क्षेत्र की सुरक्षा

विश्व टेलीविजन दिवस पर, डिज़्नी स्टार ने डीटीएच और केबल बिरादरी का सम्मान करने के लिए ##KHUSHIYONKEPEECHE अभियान की शुरुआत की