बिबट्याचा मानवीवस्तीवरील वावर व हल्ले रोखण्यासाठी तात्काळ पावले उचला
- जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या वनविभागाला सुचना
- आरेतील निर्जन ठिकाणी सोलर लाईट व सीसीटीव्ही बसविण्यात येणार
- आरेच्या मुख्य रस्त्यावर लवकरच लाईटची व्यवस्था
- बिरसामुंडा चौक येथे हायमास्ट बसविणार
मुंबई :
आरे कॉलनीतील मानवीवस्तीवरील बिबट्याचा वाढता वावर तसेच हल्ल्यामुळे येथील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या हल्ल्यापासून येथील नागरीकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने तात्काळ पावले उचलावीत, अशी सुचना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना दिल्या.
आरे कॉलनीतील बिबट्याचा वावर, महिलांची सुरक्षा तसेच स्वच्छतेसंदर्भात आमदार रविंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली आरे पोलिस ठाणे येथे संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी नगरसेविका रेखा रामवंशी, पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे, आरे प्रशासनाचे मुख्याधिकारी राजेद्र राऊत, वनविभागाचे अधिकारी देसाई, रामेश्वरी बोंगाळे, दिनेश देसले,आरे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षीका ज्योती देसाई, मनपाच्या घनकचरा विभागो अधिकारी संदिप मयेकर, अदाना इलेक्ट्रीक कंपनीचे महाव्यवस्थापक सुनिल दळवी, विनोद आचरेकर, विधानसभा क्षेत्राच्या महिला संघटक शालिनी सावंत, उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, उपविभाग संघटक मयुरी रेवाळे, शाखाप्रमुख संदिप गाढवे, बाळा तावडे, महिला शाखा संघटक हर्षदा गावडे, सुरेखा गुटे, पुजा शिंदे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसापासून आरे कॉलनीतील मानवी वस्तीतील बिबट्याचा वावर वाढला असून हल्ला करण्याच्या घटनाही घडत आहे. याची गंभिर दखल घेत आमदार वायकर यांनी तात्काळ बैठक घेत याप्रश्नी वनविभागाकडून करण्यात येणार्या उपाय योजनांची माहिती घेतली. बिबट्याचा माग घेण्यासाठी सेंसर बसविणे शक्य आहे का? सायरनची व्यवस्था करता येईल का? आदि बाबी तपासून पहाव्यात अशा सुचना वनअधिकार्यांना केल्या. एवढेच नव्हे मानवीवस्तीलगत पडलेला कचरा तात्काळ उचलण्यासाठी तसेच घराजवळील वाढलेली झुडपे काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सहाय्य करावे, अशी सुचनाही वायकर यांनी यावेळी मनपाचे सहाय्यक आयुक्त यांना केली. त्यानुसार याकामी तात्काळ मदत करण्याचे आश्वासन सहाय्यक आयुक्त धोंडे यांनी यावेळी दिले.
बिरसामुंडा चौक येथे हायमास्ट बसविणार
महिलांच्या संरक्षणासाठी आरे कॉलनीतील निर्जनस्थळी लगेचच सोलर दिले बसविण्यात येथील, असे आश्वासन. आरे कॉलनी पोलिस ठाण्याला पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन देण्यात येणार तसेच बिरसा मुंडा चौक येथे हायमास्ट बसविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
वनविभागाची चौकी व अधिकार्यांची नेमणुक करावी
बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या घटना बघता, आरे कॉलनीत वनविभागाची एक कायमस्वरुपी चौकी असावी या चौकीत कायमस्वरुपी वनअधिकार्याची नेमणुक करण्यात यावी, अशी सुचना आरे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकारी ज्योती देसाई यावेळी केली.
Comments
Post a Comment