जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असतील तेथील नागरीकांना दिलासा देण्यासाठी धडक कारवाई करा

 - जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची पोलिसांना सुचना

- नो पार्कींगमध्ये उभ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सुचना
- जोगेश्‍वरी जनतेच्या अधिक सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या मदतीने आवश्यक त्या ठिकाणी आमदार निधीतून सीसी कॅमेरे बसविणार 

मुंबई :  
महाराष्ट्रातील पोलिस विभाग हा एक आदर्श विभाग आहे. कोरोनात लॉकडाऊनचा ङ्गायदा उचलत जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असतील त्या सर्व ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई करावी. तसेच जनतेच्या अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने आमदार निधीतून सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे आश्‍वासन  देतानाच जोगेश्‍वरीतील अवैध धंद्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी सुचना    जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पोलिसांना केली. 

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था संदर्भात पोलीस अधिकार्‍यांसमवेत विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पोलिसांसमवेत त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला पोलिस उपायुक्त डॉ. महेश्‍वरी रेड्डी, जोगेश्‍वरी यु. एस. कदम, मेघवाडीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक एस. बी. पिंपळे, एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जे. एस. शिंदे, तसेच जोगेश्‍वरी वाहतुक विभागाचे पोलिस अधिकारी एस. डी. महाले, नगरसेवक बाळा नर, प्रविण शिंदे, विधानसभा संघटक विश्‍वनाथ सावंत, महिला संघटक शालिनी सावंत, उपविभागप्रमुख बाळा साटम, जयवंत लाड, कैलाशनाथ पाठक, जितेंद्र वळवी, समन्वयक  बावा साळवी, भाई मिर्लेकर, शाखा प्रमुख मंदार मोरे, सुभाष मांजरेकर, नितिश म्हात्रे, नंदु ताम्हणकर, प्रदीप गांधी आदी पदाधिकारी तसेच जनता उपस्थित होती.

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर अन्य जबाबदारी असल्याने जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी यांच्या नाव देण्यात आलेल्या विजय साळस्कर उद्यान, हेमंत करकरे उद्यान, दुर्गानगरच्या मागील आरे कॉलनीच्या भागात, शामनगर तलावाच्या पाठीमागे, म्हाडा कॉलनी मैदान, संजयनगर, मेघवाडी कब्रस्तान शेजारी, इंदिरानगर, तक्षशिला, कोकण नगर आदी ठिकाणी अवैध धंदे, चरस विकणारे, गर्दुले, महिलांची छेडछाड आदी घटनांमध्ये वाढ झाली. यासंबंधात जोगेश्‍वरीतील जनतेने आमदार वायकर यांची भेट घेऊन विभागात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. याची गंभिर दखल घेत वायकर यांनी पोलिस उपायुक्त व संबंधित पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत उपस्थित जनतेने विधानसभा क्षेत्रातील विविध भागात उघडपणे सुरू असलेल्या अवैध व यामुळे स्थानिक जनतेला होणारा त्रास याची माहीती उपस्थित पोलिस अधिकार्‍यांना दिली. त्यामुळे हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत तसेच निर्जनस्थळी पोलिसांचे पेट्रोलिंग वाढविण्यात यावे, अशी मागणी केली. 

यावर पोलिस उपायुक्त डॉ. महेश्‍वरी रेड्डी यांनी, विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या असून असे व्यवसाय करणार्‍यांची नावे पोलिसांनी मिळाली असून लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. विधानसभा क्षेत्रातील निर्जनस्थळांची माहिती काढण्यात आली असून त्या ठिकाणी स्थानिकांना पुरेशा लाईटची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. स्थानिक जनतेच्या मागणीनुसार अनेक ठिकाणी क्युराको तयार करण्यात आले असून ते त्या त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. संबंधित पोलिस ठाण्याचे बिट मार्शल त्या ठिकाणाला सातत्याने भेट देत असतात. अजुन ज्या ठिकाणी क्युआर कोड बसविण्याची मागणी जनतेने केल्यास अशा ठिकाणीची यादी संबंधित पोलिस ठाण्याला देण्यात यावी, त्यानुसार क्युआरकोड तयार करुन त्या त्या ठिकाणी लावण्यात येतील तसेच त्या ठिकाणी पोलिसांचे पेट्रोलिंगही वाढविण्यात येईल, असे आश्‍वासनही पोलिस उपायुक्त रेड्डी यांनी दिले.

विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी,‘विधानसभा क्षेत्रातील जनतेचा त्रास कमी करण्यासाठी ज्या भागांमध्ये अवैध पार्कींग करण्यात याले आहे त्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, विभागातील गांजा, चरसारखे घातक अमली पदार्थ विकणारे, अवैध दारुचे अड्डे, दुकाने यांच्यावरही पोलिसांनी तात्काळ धडक कारवाई सुरु करावी, अशी सुचना केली. एवढेच नव्हे तर जनतेच्या अधिक सुरक्षिततेच्यादृष्टीने विधानसभा क्षेत्रातील निर्जनस्थळावर तसेच पोलिसांच्या मदतीने आवश्यक त्या ठीकाणी आमदार निधीतून दिवाबत्ती तसेच सीसी कॅमेरे बसविण्याची तयारी वायकर यांनी दर्शवली. हमरस्त्यावर ड्रेबिज टाकणार्‍यावर आळा बसविण्यासाठी सीसी कॅमेरा बसवून दोषींवर कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी पोलिसांनी केल्या. 

Comments

  1. Thank you for sharing very useful & informative article.
    For sofa repair service contact thesofastore they gives
    Best Sofa Repair Services in Chikkalasandra,Bangalore

    ReplyDelete
  2. wonderful blog post
    The best astrological services contact. Vashikaran Astrologer in Davangere

    ReplyDelete
  3. Thanks for sharing, nice post! Post really providing useful information!
    PLEASE VISIT OUR WEBSITE : Sofa Renovation Near Me

    ReplyDelete
  4. Its very interesting,thank you for posting such a good article.
    please visit our website ; Love Problem Solution in Mangalore

    ReplyDelete
  5. Nice well-written article.Keep sharing like this article.
    please visit our website : Vashikaran Specialist in Hyderabad

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

'अक्षरभारती' भारतीय सुलेखन सौंदर्याचे दर्शन घडविणारे प्रदर्शन आणि पुस्तकाचे अनावरण - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

श्री अरुण नंदा ने शानदार पारी के बाद अपने रिटायरमेंट की घोषणा की

Mahapex-2025